आम्ही फिक्‍सिंग रोखू शकत नाही – बीसीसीआय

आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचा कलंक लागल्याने खडबडून जाग आलेल्या बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. स्पॉट फिक्सिंग चौकशीसाठी एक समिती स्थापन केलीय. दरम्यान, बुकींबाबत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2013, 03:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचा कलंक लागल्याने खडबडून जाग आलेल्या बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. स्पॉट फिक्सिंग चौकशीसाठी एक समिती स्थापन केलीय. दरम्यान, बुकींबाबत आम्ही काहीही करू शकत नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन, श्रीनिवास यांनी सांगितले.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणानंतर क्रिकेट विश्वात झालेल्या उलाथापालथींवर चर्चा करण्यासाठी आज बीसीसीआयची महत्तवपूर्ण बैठक चेन्नईमध्ये झाली. या तातडीच्या बैठकीत क्रिकेटपटूंवरील कारवाईबाबत धोरण निश्चित केले जाईल,अशी शक्यता होती. मात्र, ठोस आश्वासन न देता चौकशी स्थापन केल्याचे स्पष्ट करण्यात आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेल्या श्रीशांत, चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्या चौकशीचा अहवाल अद्याप आलेला नाही.
आयपीएलला अधिक पारदर्शक बनवण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या आयुक्तपदी रवी सवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये रवी शास्त्री, वाय.पी.सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीचा तपास अहवाल मिळाल्यानंतर बीसीसीआय आरोपी क्रिकेटपटूंवर कारवाईचा बडगा उगारेल, असे स्पष्ट केले.

खेळातील बुकींच्या सहभागावर आम्ही नियंत्रण ठेऊ शकत नाही असे सांगताना लोकांची फसवणूक करणाऱ्या या क्रिकेटपटूंविरोधात राजस्थान रॉयल्स गुन्हा दाखल करेल, असे बीसीसीआयने सांगितले. आयपीएलमधील फिक्सिंग रोखण्यासाठी बीसीसीआयने प्रत्येक संघासाठी भ्रष्टाचार विरोधी पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.