www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मॅचसाठी टीम इंडिया सज्ज झालीय. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि दोन सामने खेळणार आहे.
आयसीसीच्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारतानं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. टेस्ट रँकिंगमध्ये भारताच्या खात्यात ११९ गुण असून, अव्वल स्थानावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात सर्वाधिक १३१ गुण आहेत.
दक्षिण ऑफ्रिका दौऱ्यातील वनडे मॅचचं वेळापत्रक
> वन-डे मॅच – गुरुवार ५ डिसेंबरला जोहान्सबर्गमधील न्यू वंडर्स स्टेडियमवर, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता...
> दुसरी वनडे – रविवार ८ डिसेंबरला दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर, भारतीय वेळेनुसार दीड वाजता...
> तिसरी वनडे - बुधवार ११ डिसेंबरला सेंच्युरीअनच्या सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता मॅच
त्यानंतर शनिवार १४ डिसेंबर ते रविवार १५ डिसेंबरला एक सराव सामना होईल.. भारतीय वेळेनुसार मॅच दुपारी दीड वाजता...
दक्षिण ऑफ्रिका दौऱ्यातील टेस्ट मॅचचं वेळापत्रक
> पहिली टेस्ट मॅच – बुधवार १८ डिसेंबर ते रविवार २२ डिसेंबर जोहान्सबर्गमधील न्यू वंडर्स स्टेडियमवर, भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल मॅच
> दुसरी टेस्ट मॅच - गुरुवार २६ डिसेंबर ते सोमवार ३० डिसेंबर दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर, भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता मॅच सुरू होईल...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.