www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जाहिरात विश्वाचा राजा बनला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टन स्पोर्टस आणि अॅमिटी युनिव्हर्सिटीबरोबर तो २५ कोटींचा करार करणार आहे. या करारानंतर धोनीच्या बॅटची किंमत असणार आहे ती २५ कोटी.
महेंद्रसिंग धोनी... क्रिकेटच्या मैदानावर सध्या त्याचाच बोलबाला... नंबर वन कॅप्टन, नंबर वन बॅट्समन आणि नंबर वन विकेट कीपरसुद्धा... २२ यार्डाच्या पिचवर जसं त्याचं साम्राज्य आहे. त्याचप्रमाणं मैदानाबाहेरही माहीचाच जलवा आहे. जाहिरातींच्या दुनियेत धोनी ब्रँडची चांगलीच चलती आहे.
विराट कोहली त्याला यामध्ये जोरदार टक्कर देत होता. मात्र. आता कोहलीलाही धोनीनं पुन्हा एकदा मागे टाकलं आहे.कोहलीनं १६ कोटींचा करार करत नवा विक्रम केला होता. मात्र, आता धोनी ऑस्ट्रेलियाच्या स्पार्टन स्पोर्ट्स आणि अॅमिटी युनिवर्सिटीबरोबर तब्बल २५ कोटींचा करार करणार आहे.
मायकल क्लार्क आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट स्टेफनी राईसबरोबर आता धोनीचही या कंपनीबरोबर नाव जोडलं जाणार आहे. एका वर्षाला धोनीला आता २५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळंच क्रिकेटविश्वात आता धोनीच्या बॅटची किंमत असणार आहे ती २५ कोटी. सर्वात महागडा क्रिकेटपटू म्हणून माही क्रिकेटविश्वात ओळखला जातो. आता आणखी एक रेकॉर्डब्रेक करार करत त्यानं पुन्हा एकदा जाहिरात विश्वात आपलीच जादू कायम असल्य़ाचं दाखवून दिलं.
आपल्या बॅटिंगनं आणि कुशल नेतृत्व गुणांमुळं जाहिरातदारही आपला ब्रँड एंडोस करण्यासाठी धोनीलाच सर्वाधिक पसंती देतात. आपल्या लुक आणि स्टाईल स्टेटमेंटमुळं तो यंगिस्तानचा स्टाईल आयकॉन आहे. याचाच फायदा जाहिरातदार उचलतायत.
भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन असलेला धोनी यंगिस्तानमध्ये चांगलाच पॉप्युलर आहे. आता धोनीनं विक्रमी डील करत क्रिकेटच्या दुनियेत नवा विक्रम केला आहे. माहीच्या रेकॉर्डब्रेक डीलमुळं आता क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याचाच जलवा आहे असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.