www.24taas.com, मुंबई
अजी सोनियाचा दिनू...असंच आजच्या दिवशी म्हणावं लागेल. विकास साधणारा एक स्फोट आज महाराष्ट्रानं देशाला समर्पित केला. कोयनेच्या पात्रात दुसरं लेक टॅपिंग यशस्वी करून महाराष्ट्रातल्या अभियंत्यांनी आज नवा इतिहास घडवला....
अवघ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला होता.. त्या एका क्षणासाठी, मराठी अभियंत्यांच्या त्या विलक्षण कामगिरीसाठी.. आशिया खंडातल्या दुस-या लॅक टॅपिगंचा इतिहास घडत असताना, साक्षीदार होण्यासाठी कोयनेचं अथांग पात्रच नव्हे तर साक्षात काळही थबकला होता.. आणि ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी कळ दाबली, आणि अथांग जलसागरातून उसळी घेत पाणी आसमंतात उडाले.. ती उसळी केवळ पाण्याची नव्हती.. ते कारंजे होते महाराष्ट्राच्या प्रगतीचे.. नव्या पर्वात नेण्यासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्राच्या नव्या दमाच्या अभियंत्याच्या क्षमतेचे.. आणि तहानलेला महाराष्ट्र सिचंनाखाली आणण्यासाठी सुरु झालेल्या नव्या पर्वाचे.. मराठी अभियंत्यांनी केवळ कोयनेच्याच नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी पाहिलेल्या स्वप्नांना पाण्यानं उसळी घेऊन धुमारे फुलवले... एक जलक्रांती घडवली...
यशवंतराव चव्हाणांच्या विकासदृष्टीतून कोयना जलप्रकल्प साकारला गेला. या प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात झालेल्या या दुस-या लेक टॅपिंगमुळे महाराष्ट्राच्या विकासाला आणखीनंच चालना मिळणार आहे. आणि नेमका हाच विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यातून व्यक्त केला.
भूपृष्ठावरुन केवळ पाण्याची उसळी दिसत असली तरी यामागे राबणारे हात गेली अनेक वर्ष राबत होतं. 13 मार्च 1999 ला कोयनेच्या पात्रात नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित पहिले लेक टॅपिंग झाले होते. त्या लेक टॅपिंगमुळे कोयनेच्या जलसंचयात वाढ झाली होती.. मात्र त्यानंतर पाण्याचा साठा आणि मागणी यात फरक असल्यानं पुन्हा लेक टॅपिंगची गरज निर्माण झाली होती. यासाठी कोयनेच्या भूगर्भाखाली एक बोगदा तयार करुन लेक टॅपिंग करण्यात आल.
यापुर्वी म्हणजे 1999 मध्ये समुद्रसपाटीपासून 618 मीटरवर लेक टॅपिंग करण्यात आलं होतं. यावेळी 606 मीटरवर लेक टॅपिंग करण्यात आलं. यासाठी साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा करण्यात आला. कोयनेच्या जलाशयाखाली बोगदा तयार करताना अनंत अडचणी होत्या. त्यातही बोगदा तयार करत असताना जलविद्युत प्रकल्पाला कुठलाही अडथळा निर्माण होवू नये याची दक्षता घेण्याची जोखीम होती. लेक टॅपिंगच्या एका स्फोटासाठी सुमारे दहा कोटीचा खर्च आलाय. पण त्यापेक्षाही पैशात न मोजता येणारी मेहनत ही मुख्य अभियंता दीपक मोडक आणि त्याच्या सहका-यानी केली. तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्व अडचणीवर मात करत हा प्रयोग यशस्वी करणा-या मराठी अभियंत्याचे कौतूक कराव तेवढ थोडंच.
कोयनेच्या पात्रात तब्बल तेरा वर्षानी पुन्हा लेक टॅपिंग करण्यात आले. फक्त आठ सेकंदात स्फोट घडवण्यात जलाशयातील पाणी बोगद्यात आणण्यास अभियंते यशस्वी झाले आहेत. या महत्वाकांक्षातील प्रकल्पामुळे उन्हाळ्यातील हजार मेगावॅटची वीजनिर्मिती तसच दुष्काळी भागातील पाण्याची गरजही भागणार आहे. महाराष्ट्राच्या विकासरेषा तपासताना 1999 चा पहिला आणि 2012 चा दुसरे लेक टॅपिंग हे महत्वाचं ठऱणार आहे...
महाराष्ट्राची वीजेची वाढती गरज आणि विद्युत पुरवठ्याचा असलेला तुटवडा हे दुष्टचक्र भेदण्याची ताकद आहे ती फक्त कोयनेच्या पाण्यात.. 1962 पासून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नाही तर प्रकाशमान करण्यासाठी कोयनेच्या पाण्याचा फार मोठा वाटा आहे. 1962, 1967, 1975 अशा तीन टप्यात वीज निर्मीती वाढवण्यात आली. त्यानंतर सुरु झाला तो चौथ्या टप्प्याच्या पर्यायाचा विचार.. टप्पा क्रमांक 1 आणि 2 ला समांतर अशा एक हजार मेगावॅट क्षमतेच्या टप्पा क्रमांक 4 ची मागणी 1985 साली मांडण्यात आली. पण लालफितीतून बाहेर पडायला दहा वर्ष उलटावी लागली.
1995 साली शिवसेना - भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवड्यानुसार 199