रेल्वे आरक्षणाला दलालांचा विळखा

उन्हाळ्याची सुट्टी आली आणि लोक आपल्या गावाचा तयारीला लागतात..पण गावाला जाण्यासाठी लागणारं रेल्वे तिकीट त्यांना मिळत नाही. नेमकं असं काय होतं की, रेल्वे काउंटरवरील तिकीट संपतात? असं काय होतं कि, प्रत्येक तिकीट वेटींग निघतं?

Updated: Apr 18, 2012, 11:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

उन्हाळ्याची सुट्टी आली आणि लोक आपल्या गावाचा तयारीला लागतात..पण गावाला जाण्यासाठी लागणारं रेल्वे तिकीट त्यांना मिळत नाही. नेमकं असं काय होतं की, रेल्वे काउंटरवरील तिकीट संपतात? असं काय होतं कि, प्रत्येक तिकीट वेटींग निघतं?

 

य़ा प्रश्नाचं उत्तर लपलंय रेल्वे तिकिटांचा दलालाचा जाळ्यात. होय..तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दलाल  फेब्रूवारी ते मे महिन्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करतात ते ही रेल्वे तिकीटांची ब्लॅकमार्केटींग करून.

कस चालतो दलालांचा धंदा...कसं बिनाधास्तपणे दलाल स्टेशन परिसरात तिकीट विकतात..आणि कसं सामान्य प्रवाशाला प्रत्येक तिकीटामागे एक हजार ते दिड हजार मोजावं लागतं...याच उत्तर शोधण्यासाठी झी चोवीस तासची टीमने सीएसटी स्थानकाचा दौर केला आणि आमच्या छुप्या कॅमे-याने जे चित्र टिपलं ते खरोखरच धक्कादायक आहे...

 

यासंदर्भात एका दलालाबरोबर झालेली बातचित अशी

रिपोर्टर- पाच तिकीट चाहिए

दलाल - कौन से ट्रेन का

रिपोर्टर - कोई भी ट्रेन चलेगा लेकिन पैसा कितना लगेगा

दलाल- एक तिकीट के पिछे 500 रुपया

रिपोर्ट - तिकीट वेटींग तो नहीं होगा ना

दलाल - कंन्र्फम मिलेगा..बस आयडी प्रूफ लगेगा और तिकीट मिल जाएगा..

यानंतर आम्ही दलाला थोडे पैसे कमी करण्याची विनंती केली..मात्र दलाल पैसे कमी करायला तयार झाला नाही आणि तो रागावून निघून गेला...

 

सामान्य प्रवाशाने रांत्रदिवस कितीही प्रयत्न केला तरी त्याला तिकीट मिळत नाही पण या दलालांना सहज रीत्या तिकीट मिळतं. सीएसटी स्टेशन वरील आरक्षण केंद्राचा पहिल्या माळ्यावर कितीतरी सामान्य प्रवाशी तिकीट काढण्यासाठी आले होते. मात्र कुणालाही कन्फर्म तिकीट मिळत नव्हतं.

सीएसटी सारख्या रेल्वे स्टेशनच्या सर्रास सुरु असलेल्या तिकीटांची या ब्लैक मार्केटींग धक्कादायक आहे. कारण, हे दलाल भर स्टेशनवर सर्रास तिकीटांचा काळा बाजार करत होते. कुणीही यांना थांबवणारा नव्हाता. प्रवाशांचा अगतिकतेचा गैरफायदा घेऊन कोट्यावधी रुपये हे दलाल कमवत आहेत, पण कुणीही यांना रोखणारा नाही