Facebook चे अँग्री बर्ड्स !

घरात इंटरनेट...हातात मोबाईलफोन आणि मित्र मैत्रिणीशी सतत कनेक्ट राहण्यासाठी केवळ फेसबुकच नाही तर जवळपास सर्व सोशल नेटवर्किंग साईटवर आकाऊंट..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 3, 2013, 12:05 AM IST

www.24taas.com, मुंबई
घरात इंटरनेट...हातात मोबाईलफोन आणि मित्र मैत्रिणीशी सतत कनेक्ट राहण्यासाठी केवळ फेसबुकच नाही तर जवळपास सर्व सोशल नेटवर्किंग साईटवर आकाऊंट..पण सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करुन आपलं मुलं देशाचा सुजान नागरीक बनेल अशी जर तुमची समजूत असेल तर पुन्हा एकदा विचार करा...
जर तुमची मुलं इंटरनेटवर जास्त वेळ घालवत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवण्याची वेळ आली आहे...कारण या मुला-मुलींनी फेसबुकवर आपल्या शिक्षकांनाच टार्गेट केलंय.. इंटरनेटच्या माध्यमातून ही मुलं आपल्या शिक्षकांना टार्गेट करु लागलेत. या विद्यार्थ्यांनी फेसबुकवर जे काही लिहीलय ते अश्लील आणि असभ्य आहे. त्यामुळे पालकांनी आता सावध होण्य़ाची वेळ आलीय..अन्यथा तुमचा मुलगा किंवा मुलगी फेसबूकचा अँग्री बर्ड होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
सोशल नेटवर्किंग साईटसवर विद्यार्थ्यांनी केलेल्या कमेंटस, मानहानीकारक शेरेबाजी आणि फोटोग्राफ्स यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी मुख्यमंत्र्य़ांना एक पत्र लिहीलय.. आणि त्यांनी या वेबपेजच्या माध्यमातून होत असलेली बदनामी थांबवण्याची विनंती केलीय.. फेसबुकवर आता किशोरवयीनच काय तर लहान मुलांचीही नियमबाह्य अकाऊंट असतात त्यामुळेच शिक्षकांवरील शेरेबाजीचा परिणाम त्यांच्यावरही होऊ शकतो.. त्यामुळे हे सारचं प्रकरण गंभीर बनत चाललय..
आजच्या इंटरनेट युगात मुलांना समाजकार्याचं शिक्षण देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या तात्काळ सोडण्यासाठी शाळा कॉलेजात इंटरनेट वेब पेज तयार केलं जातं...तसेच ते वेबपेज शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हताळलं जातं...विद्यार्थ्थी त्या वेब पेजवर आपले प्रश्न मांडतात, आणि शिक्षक त्याची उत्तर देतात.. मुलांच्या समस्याचं निराकरण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता...सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सुरु केलेला हा प्रयोग सुरुवातीला यशस्वी झाला..मात्र काही दिवसातच यामध्ये एण्ट्री घेतलीय, एंग्री बर्डने...

मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका उमा ढेरे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कन्फेशन पेज बनवलं..पण काही दिवसानंतर या पेजवर अशा काही कमेंटस आणि फोटो यायला सुरुवात झाली की, समस्या राहील्या बाजूलाच..आणि हे वेबपेज हीच एक मोठी समस्या बनली..

सुरुवातीला शिक्षकांनी वेबपेजवरील ते कमेंट, फोटो हटवण्यासाठी बरेच प्रयत्न केले.. पण दिवसेंदिवसे फोटो अपलोड होत गेले आणि कमेंटस वाढतच गेल्या.. ज्या चांगल्या कारणासाठी ते वेबपेज तयार करण्यात आलं होतं त्याचा उद्देश बाजूला पडला आणि वेबपेज बदनामी करण्याचं एक ठिकाण बनलं....
मुंबईच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शाळा कॉलेजेसमध्ये ही फेसबुकवर ही कन्फेशन पेज ओपन करण्यात आलीय.. आणि प्रत्येक ठिकाणी बदनामीच्या घटना वाढतच चालल्यायत.. शैक्षणिक समस्या मांडण्याएवजी बनावट मेल आयडी तयार करुन चुकीच्या कमेंट टाकण्याचं काम सर्रास सुरु आहे.. या सगळ्याचा लहान मुलांवर विपरीत परीणाम होतोय..
गेल्या काही दिवसात गंभीर बनत चाललेल्या या विषयावंर आम्ही कही सिनीयर विद्यार्थ्यांशी बातचित केली असता त्यानी हे घडत असल्याची कबूली दिलीय...

सोशल नेटवर्कीग साईटसवर सुरु असलेल्या या कन्फेशन पेजवरुन केवळ गुरुजनांची बदनामी होतेय असं नाही तर विद्यार्थ्यीही वाममार्गाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही... आणि म्हणूनच शिक्षक संघटनानी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हे वेबपेज बंद करण्याची मागणी केलीय.... कदाचीत भविष्यात हे वेबपेज बंदीही होतील पण आता गरज आहे ती केवळ सरकारनेच नाही तर सगळ्याची यावर नियंत्रण आणण्याची..