www.24taas.com, मुंबई
तुमची मुलं घरच्या जेवणाला नाक मुरडतात?
शाळेत डबा नेहण्यास कंटाळा करतात?
शाळेत अर्धा डबा खाऊन उरलेलं जेवण घरी आणतात?
जादा पॉकेटमनीची मागणी केलीय?
या सगळ्या प्रश्नांच उत्तर जर होय असेल तर...
सावधान !
शाळांच्या आजूबाजूला ‘जंक फूड’वर बंदी
तुमची मुलं तुमच्याकडून पॉकेटमनीच्या नावाखाली पैसे घेऊन जातात आणि त्या पैशातून ते असे काही पदार्थ खातात त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येवू शकतं. बालवयातचं मुलं लठ्ठपणाचा शिकार होतात. लिव्हर आणि पोटाचे आजार त्यांना जडतात. हे सगळं काही त्या खाद्य पदार्थामुळे घडतंय. तेव्हा वेळीच सावध व्हा. हे तर रोजच्या आहारातील खाण्याचे पिण्याचे पदार्थ आहे असं तुम्हाला वाटलं असेल, पण तो तुमचा गैरसमज आहे. कारण हे असे पदार्थ आहेत ज्याला डॉक्टरांनी ‘जंक फूड’ असं नाव दिलंय. सरकारही या जंक फूडबद्दल आता गंभीर बनलंय. कारण, या जंक फूडमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून तो संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने शाळेच्या परिसरात जंक फूड तसंच कार्बनेटेड ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची तयारी केली आहे.
जंक फूडचा संभावीत धोका आता सरकारच्याही लक्षात आला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारनेही पावलं उचलायला सुरुवात केलीय. शाळेच्या परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. शाळेच्या परिसरात बिनदिक्कतपणे विकले जाणारे घातक खाद्यपदार्थ... मात्र, याच पदार्थांमुळे तुमच्या मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या पदार्थांमुळे शाळकरी मुलांना अनेक रोग जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहारतज्ज्ञ तसेच सरकारनेही याविषयी आता गांभीर्याने विचार सुरु केला आहे. शाळेच्या परिसरात जंक फूड आणि कार्बनेटेड ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक तयारी केली आहे. शाळा परिसरात जंक फूड विक्री विषयी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर आपलं म्हणनं मांडतांना सरकारने हे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारने ‘फूड सेफ्टी एन्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात एफएसएसएआय या संस्थेला देशभरातील शाळेच्या कँटिनमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजीव मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिलीय. शाळेपासून १५०० फूटाच्या परिघात जंक फू़ड विक्रीवर बंदी घालण्यासंदर्भात नियमावली तयार करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यातच दिला होता. शाळा परिसरातील निकृष्ठ दर्जाच्या खाद्यपदार्थामुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं केंद्र सरकारने मान्य केलंय. शाळा परिसरात जंक फूडच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे शाळकरी मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. जंक फूडमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून डॉक्टरही पालकांना नेहमीच जागृत करत आले आहेत. शाळा परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका २०१० मध्ये दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जंक फूडमध्ये पौष्टिक तत्त्वांचा आभाव असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच त्याच्या विक्रीवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे.
का आलीय ही वेळ?
शाळेच्या परिसरात जंक फू़ड विक्रीवर बंदी घालण्याची तयारी सरकारने सुरु केलीय. मात्र सरकारवर ही वेळ का आलीय. याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आज रोजच्या आहारात जंक फूडचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे बिगरसंक्रमाणामुळे होणाऱ्या रोगांचं प्रमाण वाढलं आहे. लठठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ह्रदयरोग या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे रोजच्या खान्यापिन्याच्या सवईतून या रोगांना आमंत्रण दिलं जातंय. जंक फू़ड केवळ शाळकरी मुलांनाच नाही तर मोठ्या माणासांच्या आरोग्यालाही घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्गर, न्यूडल्स, समोसा, चाट, टिक्की आणि तेलात तळलेल्या पदार्थामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी सीएई या संस्थेने जंक फूड विषयी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. तो अहवाल जंक फूड खाणा-यांच्या डोळ्