प्रताप नाईक, www.24taas.com, कोल्हापूर
महाराष्ट्रातल्या नाट्य, संगीत कला वाढीस लागण्यासाठी कलेचं भोक्ते आणि आश्रयदाते असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात पॅलेस थिएटरची बांधणी केली होती. 1 मे 1979 पासून कोल्हापूर महानगरपालिका नाट्यगृहाची देखभाल करतं. मात्र या नाट्यगृहात म्हणाव्या तशा सुविधाच नाहीत. त्यामुळं रंगकर्मींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाचं भाडं जास्त आणि सुविधा मात्र कमी अशी अवस्था या नाट्यगृहाची आहे.त्यामुळं हौशी रंगभुमीवर काम करणा-या कलाकारांना नाट्यगृहाचं भाडं परवडत नाही. एखाद्या नाटकाचं प्राक्टीस करायचं असेल तर ते कुठं करायचं असा प्रश्न अनेक रंगकर्मीना पडतो. वास्तवीक कोल्हापूर महानगरपालीका आणि नाट्य परीषदेनं कोल्हापूरात आणखी नाट्यगृह व्हावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण तसं होताना दिसत नाही.
कोल्हापूर शरात अनेक जागेवर नाट्यगृहाचं आरक्षण आहे. त्याठिकाणी नाट्यगृह बांधावीत, यासाठी अनेक रंगकर्मीनी पाठपुरावा केला. पण त्यांच्या पदरी मात्र निराश आली आहे. कोल्हापूर नगरीत नाट्य चळवळ रुजावी यातुन अनेक कलाकार घडावेत, या उदांत उद्देश डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शाहु महाराजांनी पॅलेस थेअटर बांधला. पण ही नवीन नाट्यगृह उभारुन किंवा आहे त्यात सुधारणा करुन ही चळवळ कायमची रुजावी यासाठी कोणतेच प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळं अनेकांना नाट्य चळवळीबरोबर शाहु महाराजांच्या विराचारांचा विसर पडला की काय असा प्रश्न पडलाय.