www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बीसीसीआय आणि अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमुळे आपली फसवणूक झाल्याची याचिका एका प्रेक्षकानं केलीय.
तिकीट काढून आपण पाहिलेली मॅच फिक्स असल्यामुळे बीसीसीआईच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करावी, असा अर्ज नरेश मकानी यांनी किला कोर्टात केलाय.
नरेश खेमाणी यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय आणि आयपीएलच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेला फसवलंय. आयपीएलचे हे खेळ ‘खेळासाठी’ म्हणून नाही तर ‘स्पॉट फिक्सिंग’ आणि ‘मॅच फिक्सिंग’साठी खेळवले गेले आणि लोकांना फसवलं, असा आरोप फिर्यादीनं केलाय.
यासोबतच, ‘आयपीएल सीझन ६ मध्ये फ्रेंचायझी मालकांनी तब्बल पाच हजार कोटींचा नफा मिळवलाय... आणि हे पैसे लोकांना फसवून जमा केले गेलेले आहेत’ असा दावा खेमाणी यांनी केलाय.
फिर्यादीनं ५ मे आणि १३ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर पैसे देऊन तिकिटं विकत घेतल्यांच म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.