Paatal Lok 2 Twitter Review: 'खरं पोलिस स्टेशन हे जमुना पारचं...'; 'पाताल लोक 2' पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतूक

Paatal Lok 2 Twitter Review : 'पाताल लोक 2' पाहिल्यानंतर कौतूक करत नेटकरी काय म्हणाले...

दिक्षा पाटील | Updated: Jan 17, 2025, 05:52 PM IST
Paatal Lok 2 Twitter Review: 'खरं पोलिस स्टेशन हे जमुना पारचं...'; 'पाताल लोक 2' पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतूक title=
(Photo Credit : Social Media)

Paatal Lok 2 Twitter Review : 'पाताल लोक' या वेब सीरिजनं सगळ्यांना वेड लावलं होतं. या सीरिजमध्ये जयदीप अहलावतनं हाथीराम चौधरीची भूमिका साकारली होती. सुदीप शर्मा यांची ही सीरिज 2020 मध्ये प्रदर्शित झाली होती आणि त्यात अभिषेक बॅनर्जी देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. ही सीरिज प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. गेल्या बऱ्याच काळापासून 'पाताल लोक सीझन 2' प्रीमियरसाठी तयार आहे आणि काही प्रेक्षकांनी ही सीरिज पाहिली त्यानंतर यावर प्रतिक्रिया देखील दिल्या. 

जयदीप अहलावत पुन्हा एकदा हाथीराम चौधरी या भूमिकेत परतला आहे. गुल पनाग पुन्हा एकदा त्याची पत्नी रेनू चौधरीच्या भूमिकेत दिसली. 'पाताल लोक सीझन 2' हा नागालॅन्डमध्ये घडलेल्या एका प्रकरणावर अवलंबून आहे. जयदीपशिवाय 'पाताल लोक सीझन 2' मध्ये इश्वाक सिंह तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्जु बरुआ, अनुराग अरोरा, प्रशांत तमांग, मेरेनला इमसॉन्ग आणि एलसी सेखोस देखील आहे. चाहते उत्सुकतेनं 'पाताल लोकच्या 2' सीझनची प्रतीक्षा करत होते आणि ही प्रतीक्षा आज संपली आहे. 

एक नेटकरी म्हणाला, 'पाताल लोक 2 कशी सीरिज आहे. खूप गूढ आणि त्यासोबत अनपेक्षीत घटना या घडताना दिसतात. त्यामुळे ही सीरिज नक्कीच बघा. जयदीप अहलावतनं खूप चांगला अभिनय केला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बॉलिवूडला मिळालेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जयदीप अहलावत. 'पाताल लोक सीजन 2' आहे आणि हाथी राम चौधरीनं हे सिद्ध करून दाखवलं आहे की खरं पोलिस स्टेशन हे जमुना पारचं आहे. बाकी संपूर्ण जग हे बोनस आहे. नागालॅन्ड राजकारण ट्विस्ट क्राईम आणि पोलिसांचं जग यांच्यात असलेलं प्रेम. हे सीजन? खूप भारी आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पाताल लोक 2 हे सीझन मास्टरपीस आहे. इतक्या प्रतीश्रेनंतर ओटीटीवर प्रदर्शित.'

हेही वाचा : अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा?

'पाताल लोक सीजन 2' चा 17 जानेवारी रोजी प्राइम व्हिडीओवर प्रीमियर झाला. क्राइम थ्रिलर सीरिजची नवा सीझन मध्यरात्री प्रदर्शित झाला.