Best Day to Wash Hair in Periods : भारतात मासिक पाळी दरम्यान त्या दिवसांमध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल अनेक नियम सांगण्यात आले आहेत. पूर्वीपासून आजही अनेक महिला या नियमांचं पालन डोळे झाकून करतात. पूर्वी मासिक पाळी आली की, जणू ती महिला अछूत अशी वागणूक दिली जायची. पण आज काळ बदलला मासिक पाळीबद्दलचे अनेक गैरसमज दूर झालेत. महिला आज मासिक पाळी असूनही घरातील कामांसोबत नोकरीवरही जातात. पण एक नियम आहे जो ते आजही पाळतात. घरातील ज्येष्ठ लोक सांगतात की महिलांनी मासिक पाळीत केस धुवू नयेत. यामागील कारण तुम्हाला माहितीये का? तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. खरं तर आपल्या प्रत्येक प्रथा आणि नियमामागे कुठलं ना कुठं वैज्ञानिक कारण जोडलंय.
केसांशी संबंधित सर्वात मोठा समज असा आहे की मासिक पाळी दरम्यान केस धुण्यामुळे महिला वंध्यत्व निर्माण करू शकतात. होय, अशा गोष्टी केवळ खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही ऐकायला मिळतात. आता याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर असे होऊ शकतं की, प्राचीन काळी महिलांना नद्या आणि तलावावर स्नान करण्यासाठी जाण्यास मनाई होती, तेथे अनेक धार्मिक कार्येही केली जात असत. आता पीरियड्स दरम्यान पूजा करणे नेहमीच प्रतिबंध आहे.
जर आपण विज्ञानाबद्दल बोललो तर असा एक सामान्य समज आहे की पीरियड्स दरम्यान खूप थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. ब्लोटिंग सारख्या समस्यांवर देखील परिणाम होतो. आता नदीचे पाणी तापवता येत नाही, त्यामुळे प्राचीन काळी असा नियम याच कारणासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी अनेक लोक पिण्यासाठी देखील वापरत होते आणि मासिक पाळीत आंघोळ केल्यास ते अस्वच्छ होते. मासिक पाळी दरम्यान केस धुण्यास मनाई का करण्यात आली होती असे आपण गृहीत धरू शकतो.
या कल्पनेच्या पलीकडे, वास्तविकता अशी आहे की आंघोळ किंवा केस धुण्याने स्त्रीच्या गर्भाशयात काहीही फरक पडत नाही. होय, मासिक पाळीच्या काळात खूप थंड पाण्याने आंघोळ करणे टाळले पाहिजे आणि कोमट पाण्याने तुमच्या शारीरिक दुखण्यापासून थोडा आराम मिळू शकतो. मात्र याशिवाय काळजी करण्यासारखे काहीही नाही. तुम्ही पहिल्या दिवशी केस धुतले, तिसऱ्या दिवशी केस धुतले किंवा दुसऱ्या दिवशीच केस धुतले तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. शरीराचे तापमान जास्त बदलू नये म्हणून हे टाळले जाते. डोके धुतल्याने शरीराला खूप लवकर थंडावा मिळतो आणि मासिक पाळीत शरीर थोडे उबदार राहणे योग्य मानले जाते. मात्र स्त्रीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे असे काहीही नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमची मासिक पाळी 3 दिवस चालली असेल तर तुम्ही चौथ्या दिवशी केस धुवावेत. तसे, तुमची मासिक पाळी संपल्यानंतर तुम्ही तुमचे केस कितीही दिवस धुवू शकता. तसं, पाचव्या दिवशी केस धुणे सर्वात शुद्ध मानले जाते. तुमची मासिक पाळी एक किंवा दोन दिवस राहिली तरी तुम्ही पाचव्या दिवशी केस धुवावेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)