www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली आहे व त्यासाठी वेगवेगळ्या गणेश मंडळाची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसाने गणेश मूर्तीच्या निर्मितीला अडथळे येत असल्याने नागपूरच्या मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे...
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र नागपुरातल्या चितार ओळीत गणेश मूर्तीच्या निर्मितीच्या पहिल्याच टप्प्याचं काम सुरु आहे. संततधार पावसामुळे गणेशमूर्तीचं काम पूर्ण झालेलं नाही... व्यापा-यांकडून आधुनिक उपकरणांच्या मदतीने गणेश मूर्तींना सुकवण्याचा प्रयत्न केला जातोय... त्यासाठी गॅसची वाफ आणि शेकोटीचा आधार घेतला जातोय... तरी मूर्तीच्या निर्मितीला विलंब होत असल्याने मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..
गणेश मंडळाच्या मूर्तीची आर्डर सहा महिन्यांआधीपासून येते.. मोठमोठ्या मूर्तीची काम जवळपास पूर्णत्वास येत असले तरी छोट्या घरगुती मुर्तीचे काम कमी प्रमाणात झालंय.. त्यामुळं व्यापा-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे...तरी उत्सवादरम्यान गणपती मूर्तीचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहकांनी आता पासून खरेदीला प्राधान्य दिलंय..
राज्यात वरुणराजाने धुमाकूळ घातलाय... त्यामुळे आगामी काळात पावसाने उसंत घेतली नाही तर गणेशोत्सवाच्या उत्सवावर पाणी फेरण्याची शक्यता आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.