www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेला दावा खरा ठरला तर मी सार्वजनिक राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करीन, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी दिलेय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी दूरदर्शनच्या मुलाखातीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे आपले मित्र असल्याचे सांगीतलं होत. या गोष्टीला अहमद पटेल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. जर का मोदींनी आमच्या मैत्रीबाबतचे पुरावे दिले, तर मी माझ्या राजकीय जीवनातून संन्यास घेईन अशी भूमिका पटेल यांनी घेतली आहे.
दूरदर्शनच्या मुलाखातीत मोदी म्हणाले होते की, अहमद पटेल हे माझे चांगले मित्र होते. माझे आणि अहमद पटेलांचे व्यक्तिगत संबंध देखील होते आणि माझी ईच्छा होती की, ते संबंध असेच राहतील. या मुलाखतीमुळे राजकारणात एक मोठे वादंग निर्माण झाले आहे.
या प्रकरणाबाबत अहमद पटेल म्हणाले, मोदी जे आमच्या मैत्रीबाबत बोलत आहेत, या गोष्टीत काहीच तथ्य नाही. मोदींनी हे विधान राजकीय फायदा उठवण्यासाठी केलं आहे. मोदी हे लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जर का मोदींनी आमच्या मैत्रीबाबतचे पुरावे दिले, तर मी माझ्या राजकीय जीवनातून संज्ञास घेईन, अशा शब्दात पटेल यांनी मोदींचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.