www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गितेंमध्ये बैठक सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 18 जागा मिळूनही तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे.
त्यामुळं काल केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरही अनंत गितेंनी अजूनपर्यंत अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला नाही. बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यताय.
आगामी महाराष्टरातील विधानसभा डोळ्यापुढं ठेवून भाजपानं महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना महत्वाची आणि जास्तीत जास्त खाती दिल्यानं तसंच अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला फक्त एकच कॅबिनेट अवजड उद्योग तुलनेनं रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला चांगलं खातं दिलं गेलंय. मात्र शिवसेना हा एनडीएचा भाजपाचा जुना सहकारी आहे, अनेक संकटांनंतरही सोडली नाही भाजपाची साथ सोडली नाही. मात्र भाजपला स्पष्ट बहुमत आल्यानं शिवसेनेचा एनडीएतला मान कमी झाला.
मुंबईलाही एकही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तसंच पाकिस्तानला शिवसेनेचा विरोध असतानाही नवाझ शरीफांना आमंत्रण देउन शिवसेनेची कोंडी केली होती. एकूणच शिवसेनेमध्ये नाराजी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.