इंजिनिअर ते नोकरशाह आणि नोकरशाह ते सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता ते राजकारणी बनलेले अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेत आणून राजकीय विचारधारा बदलली. या ४५ वर्षीय नेत्याने समोरून मोर्चाची धुरा सांभाळून अपारंपारिक रित्या आपल्या मोहिमेची सुरूवात केली. त्याच्या पक्षाने दिल्ली विधानसभेत दुसरा मोठा पक्ष बनून १५ वर्षापासून सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्या उखडून फेकले आणि सरकार स्थापन केले. परंतु, ४९ दिवसातच केजरीवाल सरकारने आपल्या निर्णयांमुळे आणि मंत्र्यांचा कारनाम्यांमुळे चांगले लक्ष वेधून घेतले. आता केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात चांगला पर्याय देण्याच्या विचार करीत आहेत. ते लोकसभा निवडणुकीत कंबर कसून उतरले आहेत. त्याचा आम आदमी पार्टी हा पक्ष ४०० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.
परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून राजकारणात आलेले केजरीवाल आपल्या नम्र वाणी आणि सहज व्यक्तिमत्वामुळे राजधानीच्या लोकांना चांगल्या भविष्याचे स्वप्न दाखविले. नाविण्याचे स्वप्न दाखविण्यात ते यशस्वी झालेत. भ्रष्टाचार, महागाई, लालफितीत अडलेला कारभार आणि नोकरशाहीने गांजलेल्या मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झालेत. सरकार बनविल्यावर आपल्या जबाबदारीपासून ४९ दिवसांत पळ काढणाऱ्या नेत्याला जनता स्वीकारणार का हे येणाऱ्या निवडणुका सांगतील.
केजरीवाल यांनी भारतीय राजकारणाच्या खेळातील जुने नियम आणि कायदे बाजुला सारून नव्या खेळाचे मापदंड निर्माण केले. भ्रष्टाचार विरोधी सुरू केलेल्या सामाजिक आंदोलनाने भारतातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक अधिकार समूह, बिगस सरकारी संघटना, सामाजिक कार्यकर्ता, महिला आणि शहरी तरूणांमध्ये असलेल्या उर्जेला आपल्या सोबत घेवून चालले.
१६ ऑगस्ट १९६८ मध्ये हरियाणाच्या हिसारमध्ये गोविंद राम केजरीवाल आणि गीता देवी यांच्या घरी जन्माला आलेले अरविंद यांनी भ्रष्टाचार, वीज दर आणि पाणी बिलातील वाढ, महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल करत राजकीय पटलावर भयाचे वातावरण निर्माण केले. जनतेच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित पक्षांच्या वोट बँकेला तोडण्यात यश मिळवले. दिल्लीत ७५ वर्षीय अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनच्या माध्यामातून केजरीवाल २०११मध्ये उदयास आले.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते केजरीवाल यांनी किरण बेदी, प्रशांत भूषण आणि इतरांसह टीम अण्णांचे सदस्य होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.