www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
ठाण्यानं पहिल्यापासूनच शिवसेनेवर प्रेम केलंय. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाच्या जोरावर राजन विचारे विजयी होतील, असा विश्वास रश्मी ठाकरे यांनी व्यक्त केलाय.
तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी त्यांच्या होमपीचवर अर्थात डोंबिवलीत प्रचार केला. यावेळी त्यांनी चौकाचौकात आणि घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला.
नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांसह बसपनंही उमेदवार उभा केल्यानं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी होणार का, याकडे लक्ष लागलय. बहुजन समज पक्षाच्या वतीने काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक दिनकर पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. मायावतींची पहिली सभा नाशकात घेऊन राजकीय धुराळा उडवून लावणारे पाटील आता दारोदारी मतांसाठी जोगवा मागतायत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.