पवार कन्येकडूनही मोदींना क्लीनचिट...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्या आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनीही नरेंद्र मोदींना क्लीनचिट देऊन टाकलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 18, 2014, 11:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्या आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनीही नरेंद्र मोदींना क्लीनचिट देऊन टाकलीय. गुजरात दंग्यातील नरेंद्र मोदींवर होणाऱ्या आरोपांबाबत त्यांनी मोदींचीच बाजू घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलेली स्तुती काही वेगळी राजकीय समीकरणांची चिन्हं तर नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
जेव्हापर्यंत कोर्टात सिद्ध होत नाही, तेव्हापर्यंत नरेंद्र मोदींना दोषी मानने योग्य नाही, असं सुप्रीया सुळे यांनी म्हटलंय.
एका वर्तमात्रपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रीय सुळे यांनी हे वक्तव्य केलंय. `कुणालाही कुणाचा हत्यारा संबोधत गोंधळ निर्माण करणं योग्य नाही. कोर्टाला आपलं काम करू द्यावं` असंही त्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.