Saif Ali Khan Attack : बॉलिवूडमधील छोटे नवाब सैफ अली खानवर 16 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर चोर सैफ अली खानच्या घरी कसा पोहोचला, त्या रात्री नेमकं काय झालं. करीना कपूर घटनेच्या वेळी कुठे होती आणि सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं, असे प्रश्न सर्वसामान्यांसोबत पोलिसांनाही पडले होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर त्याचावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. लिलावतीमध्ये सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 5 दिवसांनी त्याला लिलावती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आले. त्यानंतर गुरुवारी (23 जानेवारी) ला रात्री उशिरा सैफ अली खान याने घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दल मुंबई पोलिसांकडे जवाब नोंदवलाय.
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला मुंबईतील वांद्रे भागात 'सदगुरू शरण' इमारतीमधील त्याच्या 12व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यालाही अटक केलीय. त्यानंतर गेल्या आठ दिवसांत हल्ल्याच्या कटाचे अनेक पैलू आणि सत्य देशासमोर येत आहेत. आता पहिल्यांदाच सैफ अली खानने त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने पोलिसांना सांगितलंय की, तो आणि त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खान 11व्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये होते, तेव्हा त्यांना घरातील मदतनीस एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला. जी त्यांचा लहान मुलगा जहांगीरचा खोलीतून आला होता. त्यानंतर जेहच्या खोलीत पळत गेलो, त्यांना तिथे एक अनोळखी व्यक्ती दिसली. सैफने सांगितलं की त्याने हल्लेखोरावर वार केला आणि त्याला पकडलं. दरम्यान, हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी चाकूने अनेक वार केले. सैफने सांगितलंय की जेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर चाकू मारला तेव्हा तो गंभीर जखमी झाला आणि कशी तरी स्वतःची त्याचा तावडीतून सुटका करून घेतली, नंतर हल्लेखोराला मागे ढकललं.
यानंतर घरातील एक कर्मचारी जेहसह दुसरेकडे पळून गेली. या हल्ल्यात फिलिपही जखमी झाली होती. 56 वर्षीय फिलिपने नंतर सैफला सांगितलं की, अभिनेता येण्यापूर्वी त्या व्यक्तीने तिच्याकडे 1 कोटींची मागणी केली होती.
दरम्यान एका कर्मचाऱ्याने जखमी सैफ अली खान लीलावतीमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर पतोडी कुटुंबियाचा निटवर्तीय आणि मित्र अफसर जैदी यांना पहाटे 3.30 वाजता सैफच्या घरातून घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर साधारण 4 वाजता जैदी हा हॉस्पिटलला पोहोचला आणि त्याने सैफला रुग्णालयात दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली. या घटनेनंतर सैफ अली खानला पहाटे लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या मानेला आणि हाताला झालेल्या दुखापतींसाठी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. तर 21 जानेवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये घुसलेला व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घुसल्याचे पोलिसांनी सांगितलं. बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे या हल्लेखोराचं नाव असून त्याला ठाण्यातून अटक करण्यात आलीय.
दरम्यान, सैफ अली खानच्या वांद्र्याच्या फ्लॅटमधून गोळा केलेले फिंगरप्रिंट शरीफुलच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत. आरोपींनी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर चढण्यासाठी वापरलेल्या पाईपवर या खुणा आढळल्या. जेहच्या खोलीच्या दरवाजाच्या हँडलवर आणि बाथरूमच्या दारावर अतिरिक्त खुणा आढळून आल्या असून, ज्यामुळे आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी जोडला गेलाय.
तर शरीफुलचे वडील रुहुल अमीन यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलंय की, सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला माणूस त्याच्या मुलाशी अजिबात जुळत नाही.