www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने 10 उमेदवार उभे केले होते. या दहाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. याआधीच्या निवडणुकीत मनसे दोन क्रमांकावर राहिला होता. लाखाच्या घरात मते पडली होती. मात्र, एकच उमेदवाराला लाखभर मते मिळालीत. अन्य उमेदवारांना लाखाचा आकडा गाठता आला ऩाही. मतांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. यावर विचारमंथन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडूक होणार आहे. त्यामुळे आतापासून पुढील व्युहरचना आखण्यासाठी या बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. याचाही परिणाम म्हणून मतांमध्ये घट झाल्याचे म्हटले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.