ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा

ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

Updated: Dec 23, 2016, 02:47 PM IST
ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा title=

मुंबई : ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.

1. ऑफिसमध्ये झोप येत असल्यास च्युईंगम चघळा. यामुळे झोप दूर होईल. तुम्हाला च्युईंग गम आवडत नसेल तर स्नॅक्स अथवा शेंगदाणे खा. 

2. सतत एकच काम करुन फार कंटाऴा येतो. त्यामुळे वेगळं काहीतरी ट्राय करा. अथवा कामाची पद्धत बदला. यामुळे ते काम कंटाळवाणे होणार नाही.

3. जेवणानंतर लगेचच कामाच्या ठिकाणी बसू नका. काही वेळ चाला.

4. झोप येत असल्यास चहा अथवा कॉफीचे सेवन करा. कॉफी आणि चहामध्ये असलेल्या तत्वामुळे मेंदू नेहमी सतर्क राहतो. त्यामुळे कम्प्युटरसमोर बसून झोप येत असेल तर उठा ब्रेक एरियामध्ये जाऊन छानशी कॉफी प्या. 

5. दुपारच्या जेवणात भरपूर खाल्ल्यास नक्कीच झोप येते. त्यामुळे हल्के पदार्थ खा. जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल तर ती बदला. कारण गोड खाल्ल्याने झोप येते.