मुंबई: प्रत्येकाच्या घरात ओवा एक मसाल्याच्या स्वरुपात असतो. याचा वापर आपण अनेकवेळा जेवनामध्ये करतो आणि ओवा हे एक प्राकृतिक औषध पण आहे.
घरगुती उपाय करुन तुम्ही छोट्या-छोट्या आजारांवर घरीच उपचार करु शकता. ओवा हा पदार्थ आपल्या शरीरातील अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो.
या आजारांना झटपट बरं करतो ओवा...
1. रोज थोडा ओवा खाल्ल्याने हृद्याच्या आजारांचा धोका कमी होतो.
2. किडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो.
3. सर्दी असेल तर पाण्यात थोडा ओवा टाकून ते पाणी उकळून पिल्याने किंवा ओव्याची धुरी घेतल्याने सर्दी ताबडतोब बरी होते.
4. ओव्याचे पाणी दातदुखीसाठी फायदेशीर असते. या पाण्याचे रोज सेवन केल्याने तोंडातून येणारी दुर्गंधीपण दूर होते.
5. ओवा रोज जेवनानंतर खाल्ल्याने पोटातला गॅस कमी होतो.