न्यू यॉर्क: नखं एकदा कापल्यानंतर पुन्हा का उगवतात? याचा शोध घेतांना संशोधकांना नखांमध्ये एक नव्या प्रकारच्या स्टेम पेशी गट सापडला. त्यांच्यामते याच स्टेम पेशीमुळं नखं आणि त्याला जोडून असलेली त्वचा पुन्हा उगवण्यास मदत होते.
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियाचे मुख्य संशोधक क्रिस्टोफ कोबिलॅक यांनी सांगितलं, हा खूपच आश्चर्यकारक शोध आहे. कोबिलॅक म्हणाले, नखांमध्ये असलेल्या स्टेम पेशींचं दुहेरी काम आहे. जे नखं आणि त्याला जोडलेली त्वचा दोन्हींचा पुनर्विकास करण्यात मदत करते. शरिरातील इतर पुनर्विकसित होणाऱ्या बाबी म्हणजे केस आणि घामाच्या ग्रंथीमध्ये असलेल्या स्टेम पेशी यापासून वेगळ्या असतात.
प्रयोगासाठी त्यांनी उंदरांच्या नखांच्या पेशींवर चमकदार प्रोटीन आणि इतर काहींनी चिन्ह लावले. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायंसेस’ जर्नलच्या ताज्या अंकामध्ये प्रकाशित झालेल्या शोध-पत्रानुसार, यातील अनेक पेशी विभाजित झाल्या आणि त्यावर लागलेली चमकदार गोष्ट आणि इतर चिन्ह विभाजित पेशींमध्ये विलीन झाल्या.
नखांच्या मुळाशी असलेल्या लवचिक पेशींमध्ये लागलेले चमकदार पदार्थ आणि चिन्ह नष्ट झाले नाहीत. कारण त्या पेशी विभाजित झाल्या नाही किंवा खूप हळुहळू विभाजित झाल्या. संशोधकांना नंतर कळलं ही हळुहळू विभाजन होणाऱ्या याच पेशी नखांच्या पुनर्वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.