नवी दिल्ली : जसं जसं वय वाढत जातं तसतसं शरीरामध्ये अनेक पद्धतीचे बदल दिसून येणं सुरू होतं. आजारांचंही प्रमाण वाढायला लागतं. पण, आपल्याच आजुबाजुला पाहा ना... काही असेही लोक असतात जे आपल्या वाढत्या वयावर मात करतात.
वय वाढतं पण काही लोकांच्या चेहऱ्यावर मात्र हे वाढतं वय दिसत नाही. असे लोक स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनावश्यक कॅलरीला स्वत:पासून दूर ठेवतात. चला तर पाहुयात अशाच काही टीप्स ज्या तुम्हाला तुमचं वय कमी ठेवण्यात मदत करतात.
नाश्ता नक्की करा...
सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणं विसरू नका. सकाळची ही न्याहारी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही फळं, दूध, स्प्राऊट यांचा समावेश तुमच्या न्याहारीत करू शकता.
वेळवर आणि योग्य आहार
न्याहारीशिवाय तुम्हाला तुमचं जेवणही वेळेवर घ्यायचंय... दुपारच्या जेवणात भाज्या, दही आणि सलाडचा नक्की समावेश करा. त्यामुळे, तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळेल.
वेळेवर उठणं
तुम्ही सकाळी लवकर उठण्यासाठी सक्षम नसाल तर आपल्या नियमित वेळेवर उठा आणि बाहेर फिरायला बाहेर पडा... 30 मिनिटांचा वॉकही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. थोडं का होईना पण व्यायाम, योगा किंवा मेडिटेशनही करा... कार्डिओ केल्यामुळेही शरीरावरची चरबी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.
रात्रीचं जेवण हलकं ठेवा
रात्रीच्या जेवणात हलका-फुलका आहार घ्या. जेवण झाल्यानंतर लगेचच झोपणं टाळा... थोडं फिरून या किंवा पायऱ्या चढून-उतरुन या... किंवा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा... हीदेखील एक्सरसाइज समजली जाते.
भरपूर पाणी प्या...
दिवसभरात तुम्ही भरपूर पाणी प्याल, याची काळजी घ्या. भरपूर पाणी प्यायल्यानं तुमच्या शरीरात जे दूषित पदार्थ आहेत ते बाहेर पडण्यास मदत होईल आणि तुम्ही स्वस्थ राहाल.
तणावापासून दूर राहा...
तणाव तुमच्या आरोग्यावर खूप घातक परिणाम करतो. त्यामुळे, ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा... यासाठी व्यर्थ आणि अपायकारक उपाय न शोधता तुम्ही मेडिटेशन किंवा योगाचाही वापर करू शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.