मुंबई : दारू हा विषय आजकाल दुर्देवाने तरूणांमध्ये फॅशनच्या स्तरावर पाहिला जातो, मात्र दारू ही शरीरासाठी सर्वात घातक आहे. दारू पिण्याची सवय पडली तर ती सोडवणे अत्यंत कठीण आहे. दारूमुळे एक व्य़क्ती नाही तर संपूर्ण परिवार उध्वस्त होण्याची वेळ येते.
दारूची सवय सोडण्याचे सोप उपाय
१) स्वत:ला कोणत्या तरी कामात गुंतवून ठेवा
हा सर्वात महत्वाचा उपाय आहे, जर तुम्हाला दारूची आठवण येत असेल, तर कोणत्या तरी कामात स्वत:ला गुंतवा. कोणत्या तरी पार्कात फिरायला जा, पुस्तक वाचा, व्यायाम करा, मुलांशी गप्पा मारा.
२) आपल्या परिवाराला वेळ द्या, बोला.
दारूची सवय सोडवण्यासाठी आपल्या परिवाराची मदत होऊ शकते, आपल्या लहान मुलांमध्ये बसा, ते काय करतायत त्यावर बोला, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्या मनात काय चाललंय पाहा, त्यांच्यासोबत लहान होऊन जा.
३) जास्त प्रमाणात शुगर ड्रिंक घ्या
अनेक वेळा दारू आणि शुगर ड्रिंक यांच्यातील फरक लक्षात येत नाही, तेव्हा दारू सोडवायची असेल, तर शुगर ड्रिंग घ्या, पण दारूला विसरा.
४) थोड्या वेळाने खात राहा.
दारूची सवय पडणाऱ्या लोकांना असं वाटतं की जेव्हा त्यांना भूक लागते, तेव्हा त्यांना दारूची आठवण होते. या आधी जर तुम्हाला दारू पिण्याची सवय लागली असेल, तर टप्प्या-टप्याने खात रहा, भूक लागली की लगेच खा. शिवाय प्रत्येक दिवशी ६ ते ८ ग्लास पाणी प्या.