मुंबई : देशभरात उष्णतेची लाट वाढली आहे, काही निवडक जिल्हे सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तेव्हा उष्माघात टाळण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत.
१) उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे कधीही चांगले, मात्र अतिशय थंड पाणी पिणे टाळा.
२) फिकट रंगाचे कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा.
३) डोक्यावर नेहमी पांढरा रूमाल अथवा टोपी वापरा.
४) उष्णता वाढल्यास तोंडालाही रूमाल बांधा, नाक, कान पांढऱ्या रूमालने झाका.
५) एसीतून लगेच उन्हात, किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका, पंधरा मिनिटं सावलीत काढल्यानंतर उन्हात किंवा उन्हातून सावलीत १५ मिनिटं उभं राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा.
६) दही, ताकाचा आहारात समावेश करा. उन्हात जाणे टाळा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा, पाणी पित राहा.