www.24taas.com, झी मीडिया, लंडन
जनावरांच्या ऊतीपासून मानवी कान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळालं आहे. एखाद्या रोगी माणसाच्या ऊतींपासूनही कान विकसित करता येऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
मॅसॅच्युसॅट जनरल हॉस्पिटलमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करतानाच मानवाच्या अवयवांना पर्यायी अवयव निर्माण करण्यासंबंधी संशोधनही चालतं. या हॉस्पिटलमध्येच कृत्रिम कान विकसित करण्यात आला आहे. यासंदर्भात रॉयल सोसायटी इंटरफेस या वैज्ञानिक नियतकालिकात माहिती देण्यात आली आहे. सध्या अमेरिकेतील शास्त्रज्ञ कृत्रिम कान तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत जनावरांच्या ऊतीपासून असा कान करण्यात यश आलं आहे. हा कान नैसर्गिक कानाइतकाच लवचिक आहे.
अपघातांमध्ये कान गमावणाऱ्यांसाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकतं. याआधी शास्त्रज्ञांनी लहान मुलाच्या कानाच्या आकाराचा कान उंदरावर विकसित केला होता. आता गाय आणि मेंढ्यांच्या ऊतींपासून कानाच्या आकाराची ३ डी संरचना करण्यात आली आणि त्यातून कृत्रिम कानाचा विकास करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.