एका तासात २ वेळा हे केल्यास संतान प्राप्ती होते लवकर

 संतान प्राप्ती लवकरात लवकर इच्छिणाऱ्आ दाम्पत्यासाठी खुशखबर... एका तासात दोन वेळा संभोग केल्यास पुरूष लवकर पिता बनू शकतात. लंडनच्या नॉर्थ मिडिलसेक्स रुग्णालयात झालेल्या एका रिसर्चमध्ये समोर आले की एका तासात दोन वेळा पुरूषांनी संभोग केल्यास प्रजनन क्षमता आणि प्रेग्नेसीची शक्यता तिप्पट वाढते. 

Updated: Dec 7, 2015, 02:10 PM IST
एका तासात २ वेळा हे केल्यास संतान प्राप्ती होते लवकर  title=

लंडन :  संतान प्राप्ती लवकरात लवकर इच्छिणाऱ्आ दाम्पत्यासाठी खुशखबर... एका तासात दोन वेळा संभोग केल्यास पुरूष लवकर पिता बनू शकतात. लंडनच्या नॉर्थ मिडिलसेक्स रुग्णालयात झालेल्या एका रिसर्चमध्ये समोर आले की एका तासात दोन वेळा पुरूषांनी संभोग केल्यास प्रजनन क्षमता आणि प्रेग्नेसीची शक्यता तिप्पट वाढते. 

शोधकर्त्यांनी प्रयोगात निष्पन्न केले की पुरूषांचे स्पर्मचा दुसरा सॅम्पल एक तासात तयार होता. त्यामुळे त्यामुळे इनफर्टिलिटी ट्रीटमेंटचे यशाचे प्रमाण अधिक पटीने वाढते. शास्त्रज्ञ मानतात की हा निष्कर्ष त्या दाम्पत्यांना अधिक लाभदायक ठरणार आहे जे नॅचरल पद्धतीने संतान प्राप्ती करू इच्छितात... 

अध्यनानुसार जेव्हा पुरूषाने एका तासात दिलेल्या स्पर्मच्या दुसऱ्या सॅम्पलचा वापर केला तेव्हा आययूआय परीक्षणात सामील झालेल्या १५ महिला लगेचच गर्भवती झाल्या. 

अभ्यासात ७३ जोडप्यांना सामील करण्यात आले, ज्यांचवर इनफर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे वंधत्वावर उपचार होत होते. त्यात एका तासात एकदा सेक्स केल्यास केवळ ६ टक्के मगिला गर्भवती झाल्यात तर १ तासात दोन वेळा सेक्स केल्यास हे प्रमाण २० टक्के वाढले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.