झोपेत तुम्हाला वाईट स्वप्ने येतात का?

उत्तम आरोग्य हेच धन आहे आणि उत्तम आरोग्यासाठी गरजेची आहे झोप. जर तुम्हाला झोपेत वाईट विचार येतात, भयानक स्वप्ने पडत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. त्यामुळे साहजिक तुमचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ बिघडू शकते. 

Updated: Dec 7, 2015, 12:38 PM IST
झोपेत तुम्हाला वाईट स्वप्ने येतात का? title=

नवी दिल्ली : उत्तम आरोग्य हेच धन आहे आणि उत्तम आरोग्यासाठी गरजेची आहे झोप. जर तुम्हाला झोपेत वाईट विचार येतात, भयानक स्वप्ने पडत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. त्यामुळे साहजिक तुमचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ बिघडू शकते. 

झोपेत येणारे वाईट विचार आणि अशुभ स्वप्नांना दूर करायचे असल्यास झोपण्यापूर्वी खालील मंत्राचा नक्की जप करा
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः।।

यासोबतच आणखी एक मंत्र आहे. झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला वाईट स्वप्ने पडणार नाहीत. 
रामस्कंदम हनुमन्तं वैनतेयं वृकोदरम्
शयनयः स्मरेन्नित्यं दुःस्वपनम तस्य नाशयति।

रात्री चांगली झोप हवी असल्यास या मंत्राचा जप करुन पाहायला हरकत नाही
नान्या स्पृहा रघुपते हृदयस्मदीये
सत्यं वदामि च भवानखिलान्तारात्मा।
भक्तिं प्रयच्छ रघुपपुंगव निर्भरां मे
कामादिदोषरहितं कुरु मानसं च।

रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मन एकाग्र करुन वरील मंत्राचा जप करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.