नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!

आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.

Intern Intern | Updated: Apr 11, 2017, 10:38 PM IST
नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही! title=

मुंबई : आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.

नवीन कायद्यानुसार मानसिक रुग्णावर उपचार करताना एनेस्थिशिया आणि इलेक्ट्रो-कन्वल्सिव यांसारख्या शॉक थेरेपी करणेही बंधनकारक असेल. तसेच अशा रुग्णांना बांधून ठेवण्यासही मनाई आहे.

तसेच कायद्यातील कलम ३०९ नुसार कुठल्याही व्यक्तीने केलेल्या आत्महतेचे कारण सिद्ध न झाल्यास ती आत्महत्या मानसिक तनावातून झाल्याचे मानले जाईल.

तसेच अत्यंत तणावग्रस्त व्यक्ती आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर उपचार, त्यांची देखभाल आणि पुर्नवसन करणे आदी सेवा पुरविण्याची जबाबदारी सरकारची असेल, असे या नव्या कायद्यात तरदूत करण्यात आली आहे.