www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
कडूनिंब विविध आजारावर रामबाण औषध. आता हेच कडूनिंब कॅन्सरवर मात करू शकते हे स्पष्ट झालंय. त्यामुळे लवकरच कॅन्सरवर कडूनिंबाचे औषध उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅन्सरला मराठीत कर्करोग असेही म्हणतात.
कडूलिंब अथवा कडुनिंब वा बाळंतलिंब या नवावे ओळखले जाते. भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये अर्कपादक, निंबक, पारिभद्रक; मराठींत कडूनिंब, बाळंतनिंब; हिंदींत नीम; गुजराथींत लिमडूं आदी नावे आहेत.
भारतात जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडूनिंबाच्या प्रथिनांचा वापर कॅन्सरवर नियंत्रण आणण्यासाठी होत असल्याचे कोलकाता येथील शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. या शास्त्रज्ञानांनी उंदरावर चाचणी प्रयोग घेतला. त्यामध्ये त्यांना यश आलेय.
कडूनिंबाच्या पानातील शुद्ध प्रथिने उंदरातील ट्युमरची वाढ रोखत असल्याचे चित्तरंजन कॅन्सर संस्थेमधील (एनसीआय) शास्त्रज्ञांनी दाखविले आहे. कडूनिंबातील प्रथिने ग्लायकोप्रोटीन वा एनएलजीपी म्हणून ओळखली जातात. ही प्रथिने कॅन्सरच्या पेशीवर थेट हल्ला करत नाहीत तर शरीराला रोगप्रतिकारक क्षमता देणार्या पेशींना कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखली जाते, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले.
शरीरात वाढणाऱ्या ट्युमरच्या बाजूला रक्तप्रवाहातून इम्यून पेशी येतात, तसेच इतरही पेशी येतात. यातील काही पेशी ट्यूमरच्या वाढीला मदत करतात, तर इम्यून पेशी कर्करोगाच्या किलर पेशी मानल्या जातात. तर एनएलजीपी टोचलेले उंदीर आणि ते न टोचलेले उंदीर यांच्यातील ट्यूमरची वाढ दाखवून हे संशोधन सिद्ध करण्यात आले आहे.
आता कडूलिंबाच्या या औषधाचे माणसावर प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगातून यश प्राप्त झाल्यास कर्करोगावर बिनविषारी आणि प्रभावी असे औषध तयार करण्याचा मान भारताला मिळेल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.