मुंबई : लग्नाबाबत तुमचेही विचार नकारात्मक आहेत तर हे जरुर वाचा. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे समोर आलेय की अविवाहित व्यक्तींच्या तुलनेत विवाहित व्यक्ती अधिक आनंदी असतात. तसेच तणावाचे प्रमाणही कमी असते.
मेलन युनिर्व्हसिटीच्या संशोधनातून हा रिपोर्ट समोर आलाय. संशोधकांच्या मते लग्न अथवा रिलेशनशिप आरोग्यावर मोठा प्रभाव टाकते.
जनरल ऑफ सायकोन्यूरोअँड्रॉनॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार विवाहित व्यक्तींच्या शरीरात तणाव निर्माण करणाऱ्या कार्टिसोल हार्मोनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ते अधिक खुश असतात.
रिपोर्टनुसार कार्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढल्यास हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह, लठ्ठपणा आणि अन्य लाईफस्टाईलशी संबंधित आजारांचे प्रमाणही वाढते.