एका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या!

उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात... पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते. 

Updated: Aug 30, 2016, 08:34 PM IST
एका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या! title=

मुंबई : उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात... पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते. 

काय कराल... 
* चंदन पावडरमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा
* जर तुमच्याकडे चंदनाची काडी असेल तर ती सहाणेवर उगळा व त्याला भिजवताना काही थेंब गुलाबपाण्याचे टाका
* ही पेस्ट पिंपल्सवर लावा
* सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या
* पाहा, तुमचे पिंपल्स गायब झालेले असतील. 

वारंवार, तुम्हाला पिंपल्सच्या त्रासाला सामोरं जावं लागतं असेल तर हा घरगुती आणि अगदी सोप्पा उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.