मुंबई : वाढत्या वयासोबत त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण ठेवणेही तितकेच गरजेचे असते. त्वचेला चिरतरुण ठेवायचे असल्यास आजपासून या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
दही - प्रत्येकाच्या घरात दही असतंच. दह्याच्या सेवनानं अनेक गुणकारी फायदे आपल्या शरीराला होतात. यामध्ये चांगले बॅक्टेरिया असल्याने शरीरास अत्यंत उपयोगी आहे.
मासे - माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ फॅट्स असतात ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.
कलिंगड - कलिंगडामध्ये लायकोपेन असते ज्यामुळ त्वचा तजेलदार होते. यूव्ही किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्याचे काम लायकोपेन करते.
काकडी - रोजच्या आहारात काकडीचा समावेश केल्यास त्वचेचा तजेलपणा टिकून राहतो. काकडीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटामिन सी असते जे त्वचेसाठी फायदेशीर असते.
अॅव्होकॅडो - ओमेगा ९ फॅटी अॅसिडचा मोठा स्त्रोत म्हणजे अॅव्होकॅडो. त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी, त्वचा मुलायम बनवण्यासाठी याचा आहारात नक्की समावेश करा.