इंग्लंडची दमदार सुरवात... बॉलर पुन्हा नाकाम

राजकोट वन-डेमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये शमी अहमदऐवजी अशोक दिंडाला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

Updated: Jan 11, 2013, 04:45 PM IST

www.24taas.com, राजकोट
राजकोट वन-डेमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पहिल्यांदा बँटींग करताना इंग्लंडने दमदार सुरवात केली आहे... बेलने अर्धशतक झळकावले आहे. तर कूकही चांगली बॅटींग करीत आहे. टीम इंडियामध्ये शमी अहमदऐवजी अशोक दिंडाला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे. टेस्टमध्ये इंग्लंडकडून सपाटून मार खावा लागल्यानंतर वन-डेमध्ये टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्यासाठी आतूर असेल. त्याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिज जिंकल्यास भारतीय टीमला आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. आता टीम इंडिया टेस्टमधील मानहानिकारक पराभवाचा वचपा काढण्यात यशस्वी होते का ? याकडेच भारतीय क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.
टेस्ट सीरिजमध्ये भारताला भारतात 28 वर्षांनी मात दिल्यानंतर आता ऍलिस्टर कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश टीम वनडे सीरिज साठी सज्ज झालीय. तर वर्ल्ड कप विजयानंतर सततची ढासळती कामगिरी सुधारत इंग्लंडला वनडेत धूळ चारण्यासाठी धोनी ब्रिगेडही सरसावलीय... राजकोटवर या दोन्ही टीम्स पहिल्या वनडेत एकमेकांना टक्कर देणारएत...या सीरिजमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश दिला तर पुन्हा एकदा नंबर वनवर पोहचण्याची टीम इंडियाला संधी आहे... इंग्लंडनं टीम इंडियाला मायभूमीत 28 वर्षांनी पराभूत केलं....त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भारताच्या दौ-यावर आलेल्या पाकिस्ताननं 3 मॅचच्या वनडे सीरिजमध्येही भारताचा 2-1नं पराभव करत भारताची लाज काढली.
वर्षाच्या सुरुवातीलाच सीरिज गमवावी लागलेल्या धोनी ब्रिगेडनं तिसरी वनडे कशीबशी जिंकली आणि निदान शेवट विजयाने केला..आता टीम इंडियासमोर सुपर फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लिश टीमशी दोन हात करायचेत...पाचवनडे सीरिजचा श्रीगणेशा राजकोटमधून होणार असून दोन्ही टीम पहिली मॅच जिंकत सीरिजमध्ये विजयाने सुरुवात करण्यास उत्सुक आहेत..गेल्या दीड वर्षात टीम इंडियात टीममध्ये बरेच बदल झाले. पाक वनडे सीरिज सुरु होण्यापूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वनडे क्रिकेटला रामराम केला. तर पाक विरुद्धही न चाललेल्या विस्फोटक वीरेंद्र सेहवागलाही इंग्लंड सीरिज विरुद्ध बाहेर बसावं लागलय.
टीमवर सतत टीकेचा भाडीमार तर झालाच पण कॅप्टन धोनीच्या त्यावरही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सा-या बदलातून स्वत:ला सावरत टीम इंडिया जी आता ख-या अर्थानं यंग टीम इंडिया दिसतेय त्या टीमला इंग्लंडला वनडेत धूळ चारण्याची नामी संधी आहे. गौतम गंभीर बरोबर ओपनिंगला वीरेंद्रच्या जागी चेतेश्वर पुजारा उतरेल तर इंग्लिंश टीमला युवराज सिंगचा मोठा धोका वाटतोय. युवीच्या बॅट इंग्लिश टीम विरुद्ध नेहमीच तळपलीय. मिडल ऑर्डर संभाळण्याची मोठी जबाबदारी विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्माच्या खांद्यावर असेल तर कॅप्टन धोनीला पुन्हा एकदा फाईन फिनिशरची भूमिका बजवावी लागेल.
सुपर फॉर्ममध्ये असलेल्या ऍलिस्टर कूक, इयान बेल आणि जॉनथन ट्रॉटला रोखण्याचं भारतीय बॉलिंग अटॅकसमोर असणार. झहीरच्या अनुपस्थितीत ईशांत शर्मा, अशोक दिंडा आणि पाक विरुद्ध चमकलेला भुवनेश्वर कुमारवर बॉलिंग अटॅकची मदार असेल तर आर अश्विनला अमित मिश्राच्या बरोबरीनं आपल्या फिरकीची जबाबदारी असणार आहे.