www.24taas.com, मुंबई
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणावर टी-20ची लढत रंगणार आहे. टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर असेल तर दुसरीकडे पहिल्या टी-20त विजय मिळवल्याने पाकिस्तान टीमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आता या निर्णायक लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.
पाकिस्तानविरूद्ध पहिल्याच टी-20मध्ये झालेला पराभव टीम इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी धोनी अँड कंपनी आतूर असेल. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताला भारतात येऊन पहिल्याच लढतीत पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला असेल. आता सीरिज जिंकण जरी अशक्य असल तरी दुसरी टी-20 जिंकूण सीरिज बरोबरीत सोडवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल. यामुळेच दुस-या टी-20 थोडीशी चुकही टीम इंडियासाठी महागात ठरू शकते. पहिल्या टी-20मध्ये टीम इंडियाचे बॅट्समन विरूद्ध पाकिस्तानचचे बॉलर्स असा सामना काही रंगलाच नाही. मात्र आता दुस-या लढतीत तरी असा सामना क्रिकेटप्रेमींना अनुभवता येईल अशी आशा करूयात
गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर पुन्हा एकदा भारताला आक्रमक सुरूवात करून द्यावी लागेल. तर विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि रोहित शर्मा या मिडल ऑर्डला आता जबाबदारीनं खेळाव लागेल. बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा नवख्या भुवनेश्वर कुमारकडून तशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. याशिवाय अशोक डिंडा आणि ईशांत शर्मा या फास्टर्सवर पाकिस्तानची बॅटिंग लाईन-अप उद्धस्थ करण्याची जबाबदारी असेल. तर आता तरी आर. अश्विनला संधी मिळते का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.
दुसरीकडे पाकिस्तानच्या सा-या आशा मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिकवर एकवटलेल्या असतील. या दोघांनी पहिल्या लढतीत शानदार हाफ सेंच्युरी झळकावली होती. तर शाहिद आफ्रिदी या ऑल राऊंडवर पाकिस्तानला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. याशिवाय उमर अकमल आणि कामरान अकमल या बंधूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा पाक क्रिकेटप्रेमींना असेल. तर बॉलिंगमध्ये उमर गुल, सोहेल तन्विर या तेजतर्रार बॉलर्सचा आणि स्पिनर सईद अजमलचा टीम इंडियाच्या बॅट्समनला चांगलाच धोका असेल.
आता पाकिस्तानच्या बॉलर्सचा टीम इंडियाचे बॅट्समन कसे मुकाबला करतात. याचबरोबर निर्णायक किंवा दबावाच्या क्षणी धोनी एँड कंपनी कशी कामगिरी करते यावरच या लढतीचा निकाल अवलंबून असेल. दरम्यान या महायुद्धात कोण बाजी मारेल हे आत्ताच सांगण अवघड आहे. मात्र, आता पुन्हा एकदा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील खुन्नस अनुभवण्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी आतूर असतील एवढ मात्र नक्की..