www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
छत्तीसगडमध्ये आज नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या रॅलींचं आयोजन करण्यात आलंय. याआधीच राज्यातील वेगवेगळ्या भागांतू १०० किलोपेक्षा जास्त स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय.
छत्तीसगड निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचलीय. या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि भाजपनं सर्व शक्ती पणाला लावलीय. या निवडणुकांच्या रणांगणात दोन दिग्गजांचा आज आमनासामना होणार आहे. भाजप आणि काँग्रेसचे सभा छत्तीसगडमध्ये होत आहेत. या निमित्ताने काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आमने-सामने येतील. कोंडागाव आणि डोंगरगड इथं सोनिया गांधी यांच्या सभा होणार आहेत तर मोदींची सभा जगदलपूर, काकेंर आणि डोंगरगडमध्ये होणार आहे.
याअगोदर सोनिया गांधी यांची पूर्वेकडील कोंडागावसोबतच राजनादगाव इथंही सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु आता त्या केवळ कोंडागावमध्येच सभा घेतील, असा निर्णय घेण्यात आलाय. प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडागावासोबतच इतर क्षेत्रांमध्येही सोनिया आणि राहुल गांधी यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत.
तर नरेंद्र मोदी यांच्या आज तीन सभा होणार आहेत. मोदी गुरुवारी दुपारी १२.३५ वाजता जगदलपूर पोहतील. इथं लालबाग मैदानावर ते सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी २.४० वाजता नरहरदेव स्कूल कांकेर आणि सायंकाळी ४.१० वाजता बम्लेश्वरी मैदान, डोंगरगडमध्ये सभेला हजर राहतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.