गोड्डा : झारखंड ही अकरा वर्षाची मुलगी आहे, तिचा भाऊ सात वर्षांचा आहे, तिच्या भावाला ताप होता, तो खूप आजारी होता, म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं आणि आठ किलोमीटरची पायपीट करून हॉस्पिटल गाठलं.
अकरा वर्षाच्या मालती टुडूला असं करण्याशिवाय पर्याय नव्हता, तिच्या मदतीला आणखी कुणी कसं येणार कारण या जगात तिचे आई-वडिल नाहीत आणि आहे त्या जीवाभावाला ती गमवू इच्छीत नाही, म्हणून तिने त्याला आईची माया देत आठ किलोमीटर चालत, त्याला कडेवर घेऊन हॉस्पिटल गाठलं.
गोड्डा जिल्ह्यातील सुंदर पहाडी भागात ती राहते. तिला डॉक्टरांनी सदर हॉस्पिटलला जाण्यास सांगितलं.
एक एकरा वर्षांची मुलगी तिच्या सात वर्षाच्या भावाला कडेवर घेऊन जात असतांना अनेकांना आश्चर्य वाटलं, स्थानिकांनी तिची विचारपूस केली. मनोज भगत नावाच्या एका युवकाने तिची मदत केली.
मालती ज्या भागात राहते तो भाग सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अजून विकसित झालेला नाही, मात्र राजकीय दृष्ट्या या भागाला अजून मागे म्हणता येणार नाही. कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन या भागातून निवडून येतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.