नवी दिल्ली : सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.
मंगळवारी ही घटना घडली. हे दोन्हीही पत्रकार कश्मीरच्या एका वर्तमानपत्रासाठी काम करतात. काश्मीरजवळ रंगरेथमध्ये जम्मू कश्मीर लाईट इन्फॅन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये 'पासिंग आऊट परेड' कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडलीय.
'सेनेनं आम्हाला हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी बोलावलं होतं... यामध्ये सहभागी होण्यासाठी नाही. राष्ट्रगीत सुरू झालं तेव्हा आणि बातमी लिहिण्य़ामध्ये व्यस्त होतो. राष्ट्रगीत संपल्यानंतर कर्नल बर्न आमच्याजवळ आले आणि त्यांनी आम्हाला बाहेर जाण्यास फर्मावलं' असं या पत्रकारांपैंकी एक असलेल्या जुनैद नबी बजाज यांनी म्हटलंय. या घटनेला संरक्षण अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिलाय.