www.24taas.com, अहमदाबाद
गुजरातमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. काँग्रेस यावेळी विकासपुरूष नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. पण तरीही नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणेच अनोख्या पद्धतीने आपला प्रचार करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेऊ शकतील. ही किमया घडणार आहे ती ३-डी तंत्रज्ञानाने. सिंगापूरमधील एका कंपनीकडून हे उच्च तंत्रज्ञान मागवून घेण्यात आलं आहे. यामध्ये ३-डी व्हॅन बनवण्यात आली असून मोदी यामध्ये जेव्हा बोलतील, तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना असं भासेल, की खुद्द मोदी त्यांच्यासमोर उभं राहून त्यांच्याशी संवाद साधत आहेत.
नेहमीच्या बॅनरबाजीला काट मारत मोदींनी हे अधुनिक तंत्रज्ञान भारतात आणलं हे. यामध्ये हाय-डेफिनेशन कॅमेरे वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे जेव्हा ते कॅमेरासमोर बोलतील, तेव्हा आपल्याला त्यांचा स्पर्श होतोय की काय, असा भास निर्माण होईल. तसंच, आधुनिक साऊंड सिस्टममुळे ते आपल्या जवळ येऊन बोलत असल्याचाही आभास निर्माण होणार आहे. यामुळे असं हायटेक तंत्रज्ञान वापरून निदान प्रचारात तरी नरेंद्र मोदी काँग्रेसला पुरून उरणार आहेत.