मुंबई: देशातला आणि प्रामुख्यानं राज्यातला कृषी व्यवसाय किती खडतर परिस्थितीतून जातोय, याचं अत्यंत धक्कादायक वास्तव सरकारच्याच आकडेवारीतून पुढे आलंय.
राष्ट्रीय गुन्हे अहवालात पुढे आलेल्या माहितीनुसार देशातल्या 5 हजार 650 शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी आत्महत्या केल्या. त्यापैकी अडीच हजारांहून अधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
दिवाळखोरी, कर्जबाजारी जिणं आणि नापिकी या तीन प्रमुख कारणांमुळं महाराष्ट्रातला शेतकरी पिचलाय. महाराष्ट्राखालोखाल तेलंगणात 898 तर मध्यप्रदेशात 826 शेतकऱ्यांनी आपला नापीकीला कंटाळून आपला जीवन प्रवास संपवलाय.
देशातली सुमारे 48.5 टक्के जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळं नव्यानं प्रसिद्ध झालेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.