सिमीच्या आठ दहशतवाद्यांचे तुरुंगातून पलायन

सिमीचे आठ दहशतवादी भोपाळ येथील सेंट्रल जेलमधून फरार झालेत. जेल गार्डची हत्या करुन या दहशतवाद्यांनी रविवारी ऱात्री तेथून पलायन केले. रमाशंकर असे या जेलगार्डचे नाव आहे.

Updated: Oct 31, 2016, 09:46 AM IST
सिमीच्या आठ दहशतवाद्यांचे तुरुंगातून पलायन title=

भोपाळ : सिमीचे आठ दहशतवादी भोपाळ येथील सेंट्रल जेलमधून फरार झालेत. जेल गार्डची हत्या करुन या दहशतवाद्यांनी रविवारी ऱात्री तेथून पलायन केले. रमाशंकर असे या जेलगार्डचे नाव आहे.

या दहशतवाद्यांनी धारदार शस्त्राने जेलगार्डची हत्या केली. त्यानंतर चादरीच्या सहाय्याने भिंत चढून हे आठही दहशतवादी तेथून पळून गेले. 

भोपाळचे डीआयजी रमन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमीचे आठ दहशतवादी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास गार्डची हत्या करुन तेथून पळून गेले. 

दरम्यान, पलायन केलेल्या या सर्व दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. तसेच याप्रकरणी पाच जणांचे निलंबित करण्यात आलेय. 

याआधीही २०१३ मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते. स्नानगृहाच्या खिडकीला असलेल्या सळया तोडून या दहशतवाद्यांनी पलायन केले होते.