८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; चाकू खूपसून हत्येचा प्रयत्न

दिल्लीमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर या नराधमानं बलात्कारानंतर तिच्या शरीरात चाकूही खूपसला तसंच दगडानंही तिला ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Aug 12, 2015, 03:17 PM IST
८ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; चाकू खूपसून हत्येचा प्रयत्न title=

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर या नराधमानं बलात्कारानंतर तिच्या शरीरात चाकूही खूपसला तसंच दगडानंही तिला ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. 

ही धक्कादायक आणि तितकीच वेदनादायक घटना दक्षिण पूर्व दिल्लीच्या ओखला भागात घडलीय. एका ४५ वर्षीय नराधमानं हे कृत्य केल्याचं समजतंय. हा व्यक्ती पीडित मुलीचा शेजारी राहत होता.  

मुलीच्या शरीरावर टोकदार हत्यारानं अनेक वार केल्याचे निशाण आहेत. या मुलीला एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. तीची प्रकृती खूपच गंभीर आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार केलीय आणि छापेमारी सुरू आहे. 

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी १० जुलै रोजी शाळेत गेली होती. पण, शाळा सुटल्यानंतर मात्र घरी परतली नाही. आई-वडील तिचा शोध घेत होते.

आरोपी व्यक्ती पीडित मुलीच्या शाळेत दाखल झाला होता. आपण तिचा काका असल्याचं सांगून त्यानं तिला आपल्यासोबत मागच्या बाजुच्या जंगलात नेलं.... आणि तिथं बलात्कारानंतर या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न त्यानं केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.