नवी दिल्ली: सायबर सिक्युरिटी समिटमध्ये भारतीय वंशांच्या आठ वर्षाचा मुलगा लेक्चर देणार आहे. ही समिट गुरुवारपासून सुरू होणार आहे. यात लेक्चर देणाऱ्यांमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांचा सुद्धा समावेश आहे. 30 टक्के शालेय विद्यार्थी सायबर क्राइमचा सामना करतात.
इथं होणाऱ्या ग्राऊंड झिरो समिटच्या आयोजकांच्या मते 14 नोव्हेंबरला समिटमध्ये अमेरिकेत राहणारे रियुबेन पॉल सध्याच्या पिढीत सायबर सिक्युरिटीचं कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचं सांगतायेत. 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त हे आयोजित केलं गेलंय.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, "आठ वर्षीय रियुबेन पॉलनं ह्युस्टन सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये लेक्चर दिलंय". रियुबेननं सांगितलं, 'मी जवळपास दीड वर्षांपूर्वी कंप्युटरची भाषा शिकायला सुरूवात केली. आता मी आपले स्वत:चे प्रोजेक्ट डिझाईन करतो.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.