www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातल्या सहा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यात मुंबईतले तीन जागांसह नाशिक, पुणे आणि नागपूरच्या जागेचा समावेश आहे. मुंबईतून मेधा पाटकर, मीरा सन्याल आणि मयांक गांधी निव़डणूक लढणार आहेत. तर नागपुरातून अंजली दमानिया आणि नाशिकमधून विजय पांढरे निव़डणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर पुण्यातून सुभाष वारेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपमुळं मुंबईत अनेक ठिकाणी चौरंगी लढत रंगण्याची चिन्ह आहेत. याव्यतिरिक्त दिल्लीतून कपिल सिब्बल यांच्याविरोधात आशुतोष हे निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठीतून कुमार विश्वास हे राहुल गांधींच्याविरोधात लढणार आहेत.
पाहुयात, या संभाव्य उमेदवारांच्या यादीत कुणाकुणाच्या नावाचा समावेश करण्यात आलाय...
* मुंबई उत्तर पश्चिम - मयांक गांधी - गुरुदास कामत यांच्याविरोधात
* नाशिक - विजय पांढरे - समीर भुजबळांविरोधात
* मुंबई उत्तर पूर्व - मेधा पाटकर
* दक्षिण मुंबई - मिरा सन्याल मिलिंद देवरांविरुद्ध
* पुणे - सुभाष वारे
* नागपूर - अंजली दमानिया - नितीन गडकरींविरोधात
* अमेठी - कुमार विश्वास - राहुल गांधींविरोधात
* चांदणी चौक - आशुतोष
* फारुखाबाद - मुकूल त्रिपाठी
* मनिपूरी - बाबा हरदेव सिंग
* बागपत - सोमेंद्र ढाका
* दिल्ली दक्षिण पश्चिम - जरनैल सिंग
* लालगंज - डॉ. जिलाल
* गुरगाव - योगेंद्र यादव
* अरुणाचल पश्चिम - हाबंग पयांग
* खंडवा - आलोक अग्रवाल
* लुधियाना - एच. एस. फुलका
* सहारानपूर - योगेश दहिया
* मुरादाबाद - खालिद परवेझ
* बारगड - लिंगराज
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.