www.24taas.com, यूएनआय, फतेपूर
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.
फतेहपूरच्या आदमपूर घाटावरील प्राचीन शिवमंदिराच्या चबुतऱ्यामध्ये सोनं असल्याचा दावा शोभन सरकार यांनी केला होता. फतेहपूरच्या शिवमंदिराचे पुजारी स्वामी मोहनदास यांनी पोलिसांना सांगितलं की रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही लोक मंदिरात आले, त्यांनी स्वामींच्या डोक्यावर पिस्तूल लावलं. त्यांनी आरडाओरडा केला तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि खोदकाम सुरू केलं.
सकाळी जेव्हा या परिसरातील गावकरी शिवमंदिरात दर्शनासाठी आले तेव्हा त्यांना हा प्रकार समजला. पोलिसांना लागलीच कळविण्यात आलं. मलवा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार शिवमंगल सिंह शिवमंदिरात पोहेचल्यावर त्यांनी खोदण्यात आलेल्या खड्याची पाहणी केली. मात्र कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. रात्री येऊन खोदकाम करण्यांच्या तपास सुरू आहे, मात्र ज्यांना कुणीही पाहिलं नाही, त्यांच्या तपासासाठी काही धागेदोरे मिळाले का असं विचारल्यावर त्यांना काहीही सांगता आलं नाही.
उन्नावनंतर कानपूर आणि फतेहपूर या दोन ठिकाणी २५०० टन सोन्याचा खजिना असल्याचा नवा दावा शोभन सरकार यांनी कालच केला होता. त्यासंदर्भातील पत्रही त्यांनी जिल्हाधिकारी, रिझर्व्ह बँक आणि पंतप्रधानांना लिहिलं होतं.
दरम्यान, काही अज्ञात लोकांनी खोदकाम केल्यानंतर आता तिथली सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.