नवी दिल्ली : रस्ते वाहतूक दिवसागणिक बिकट होत आहे. त्यामुळे सामान्य लोकांना प्रवास करणे कठिण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या योजनेचा प्रस्ताव आणत आहे. जरी ही योजना यशस्वी झाली तर सर्व सामान्यांना (आम आदमी) दिलासा मिळणार आहे. त्यांना हवाई सफर कमी खर्चात करता येणार आहे.
मोदींच्या या नव्या योजनेनुसार दोन लहान शहरांच्या दरम्यान हवाई वाहतूक कमी खर्चात सुरु करावयाची आहे. २००० ते २५०० रुपयांत प्रवास करण्याची ही योजना आहे. या योजनेला मंजुरी मिळाली तर याचा लाभ मध्यमवर्गीय कुटुंबातील हजारो लोकांना होईल.
नागरिक विमान मंत्रालय एक प्रस्ताव तयार करीत आहे. छोट्या शहांत एक ते दोन तासांचा प्रवास यात समाविष्ट असेल. २००० ते २५०० रुपये माणसी भाडे असेल. मात्र, एअर इंडिया विमान कंपनीला होणारा तोटा सरकार देईल. त्यासाठी सरकार नॅशनल किंवा इंटरनॅशनल विमानांवर एक उपकर लावणार आहे.
जर भारताने ही योजना ३० कोटी लोकांसाठी आणली तर जगात भारत विमान सेवा देणारा तिसरा देश असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.