नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ऑनलाईन टिकीट बुकींगच्या वेळेत पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल करताना १५ मिनिटांची वाढ केली आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
रेल्वेच्या ऑनलाईन आरक्षणाच्या वेळेत बदल करण्यात आला असून २० सप्टेंबरपासून मध्यरात्री ००.३० ते दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ यावेळेत ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.
अधिक वाचा : मध्य रेल्वे प्रवाशांना मिळणार पेपरलेस पास
तसेच ज्या स्टेशनपासून गाडी सुटणार आहे. तेथे तत्काळ काऊंटर असणार आहे. मध्ये रात्री १२.३० ते दुसऱ्या रात्री ११.४५ वाजता तत्काळ आरक्षण खिडकी उघडी राहिल. याआधी तत्काल तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल केला होता. स्लीपर आणि एसी क्लाससाठी बुकींगची वेळ वेगवेगळी दिली होती. त्यामुळे तिकीट बुक करणे सहज शक्य झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.