नवी दिल्ली : भारती एअरटेलच्या ग्राहकांनना रात्री वापरण्यात आलेल्या डाटातील अर्धा भाग पुन्हा मिळणार आहे. तसेच विंक मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अनलिमिटेड गाणे आणि पाच चित्रपट डाऊनलोड करू शकणार आहेत.
कंपनीने स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना आपल्या नेटवर्ककडे आणखी आकर्षित करण्यासाठी ही सुविधा दिली आहे. भारती एअरटेलचे निदेशक (कस्टमर बिझनेस) श्रीनि गोपालन यांनी सांगितले की, एअरटेलने 'डेटा कॅश बॅक ऑफर' प्री पेड ग्राहकांसाठी सुरू केली आहे. पण एका आठवड्यानंतर ती ऑफर पोस्टपेड ग्राहकांसाठीही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेनुसार एअरटेल ग्राहक रात्री १२ ते ६ या काळात जे काही इंटरनेट वापरतात त्यातील ५० टक्के हिस्सा सकाळी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. ही योजना २ जी, ३ जी आणि ४ जी सर्वांसाठी लागू करण्यात आली आहे. स्मार्टफोन डिजीटल इंडियाला पुढे नेणार आहे. चांगला स्मार्टफोन अनुभव आणि सेवा देईल त्याचा त्यांना फायदा होईल.
या सेवेसाठी ग्राहकांना १२१ ला एक एसएमएस पाठवावा लागणार आहे. किंवा ५५५५५ वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. किंवा माय एअरटेल अॅप लॉग इन करावे लागणार आहे. त्यातील विंग मोबाईल अॅपद्वारे अलिमिटेड गाणे ऐकता येणार आहेत. तसेच पाच सिनेमे पाठविता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.