नवी दिल्ली : हिमालयातील प्रदेशात भूगर्भात साठणाऱ्या ऊर्जेमुळे नेपाळ, आफगाणिस्ताननंतर भारतात भूकंपाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. देश आणि विदेशातील भूगर्भ संशोधकांचे म्हणणे आहे की, हिमालयातील परिसरात मोठ्या प्रमाणात मुख्यत्वे भूमिगत ऊर्जा स्टोअर होत आहे. त्यामुळे भविष्यात याचा धोका आहे.
भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे, भूमिगत प्रचंड ऊर्जा साठत आहे. ज्या ठिकाणी जमीन कमजोर आहे. त्याठिकाणी या ऊर्जेचा स्फोट होण्याचा धोका आहे. त्यामुळे ८ रेक्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो. जमिनीला जोरदार धक्के बसू शकतात.
भूमिगत प्रचंड ऊर्जेची उलथापालत होत आहे. हिमालयातील परिसर क्षेत्रात संवेदनशीलता वाढत आहे. वाडिया हिमालय भू विज्ञान संस्थानचे भू-भौतिकी समूहाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ भूकंप विशेषज्ज्ञ डॉ. सुशील कुमार यांनी सांगितले, प्रचंड साठा होत असलेल्या ऊर्जेचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही. मात्र, भूगर्भीय प्लेटोंच्या हालचालीवर ते आहे. दरम्यान, उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीर, नॉर्थ ईस्ट या प्रदेशात भूकंपाचा धोका आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.