मुरादाबाद : मुरादाबादच्या सुरजननगर येथे फिका नदीजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाला अर्धा जळालेला मृत चितेवरून काढून खातांना रंगेहाथ पकडले आहे. सूचना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी चौकशीनंतर त्याला ताब्यात घेतले आहे. युवक तंत्रमंत्र विद्येसाठी स्मशानात राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येते आहे.
बुधवारी कनकपूर गावातील नागरिक एका व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी फिका नदीजवळी स्मशानभूमीत गेले. त्यांनी चितेला आग लावली आणि नागरिक तेथून निघून गेले. घाटावर लपून बसलेला युवक पळत आला आणि परत लपून बसला. लोकांना या ठिकाणी संशय आला. त्यानंतर त्याला एका चादरी खाली बसून काही तरी खाताना लोकांनी पाहिले.
लोकांनी त्याची कसून चौकशी केली त्यानंतर तो कबूल झाला की मांस खातो आहे, पहिल्या चितेतून काढलेले. लोकांनी त्याला पकडले आणि मारहाण केली.
पोलिसांना तेथे बोलविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर समजले की त्याचे नाव अखिलेश आहे. तो सुल्तानपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याची झटती घेतली तेव्हा पत्ते आणि कंडोमचे खाली पाकीट मिळालेत. हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या विक्षिप्त वाटला, असे पोलिसांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.